विविध शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा – श्री राजेश धुर्वे
विविध शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा – श्री राजेश धुर्वे
जिल्हा अग्रणी बँकेचे व्यावस्थापक श्री गणेश पठारे, यांनी मार्गदर्शन करताना सांगितले कि बँकेचे कर्ज मिळण्यासाठी योग्य ती पत शेतकरी ठेवत नाहीत त्यामुळे कर्ज मिळण्यासाठी शेतकऱ्यांना त्रास होतो यासाठी कर्जा बाबत सर्वाना जागृत केले पाहिजे आणि परतफेड करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.
डॉ सुरेश कुलकर्णी, वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख यांनी शेतकऱ्यांसाठी तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी नेहमीच कृषी विज्ञान केंद्राने पुढाकार घेतला असल्याचे सांगून कृषी विनिष्ठ पुरवठा करण्यासाठी पूर्ण सहकार्य करीत असल्याचे सांगितले.
श्री रोहित देशमुख, संचालक संस्कुती संवर्धन मंडळ सगरोळी यांनी अध्यक्षीय भाषणात सर्व कंपन्यांच्या पदाधिकाऱ्याना कामात सुसूत्रता आणण्यासाठी सर्व सदस्यांना सोबत घेऊन काम करण्याच्या सूचना दिल्या
नाबार्ड सहयीत १३ शेतकरी उत्पादक कंपन्याचा अहवाल प्रत्तेक कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मांडला आणि योग्य त्या सूचना उपस्थित मान्यवरांनी केल्या.
Comments
Post a Comment