Posts

Showing posts from December, 2021

विविध शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा – श्री राजेश धुर्वे

Image
  विविध   शा स कीय योजनांचा   लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा  –   श्री   राजेश   धुर्वे जोपर्यंत शेतकरी   एकत्रित   येऊन   व्यवसाय करत नाहीत तोपर्यंत शेतकरी   स्वयंपूर्ण   होऊ शकत   नाही असे अभिमत नांदेड जिल्ह्य नाबार्डचे   जिल्हा   विकास व्यावास्था पक श्री   राजेश धुर्वे यांनी दिले .   ते संस्कृती   संवर्धन मंडळ संचालित कृषी विज्ञान केंद्रांतर्गात स्थापित   शेतकरी उत्पादक कंपन्या च्या   आढावा वै ठ कीत बोलत होते . नाबार्ड   सहाय्यित १३ शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या कामाचे कौतुक करून आपल्या   कंपन्यासाठी   शासनाच्या विविध योजना गावाच्या विकासासाठी घेतल्या   पाहिजेत आणि शेतकर्यांना   गावातच   शेतीविषयक   सर्व सोई सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न   केला पाहिजे असे आवाहनही केले . जिल्हा   अग्रणी बँकेचे व्यावस्थापक   श्री   गणेश पठारे ,   यांनी   मार्गदर्शन करताना सांगितले कि बँकेचे   कर्ज मिळण्या साठी   योग्य ती   पत शेत...

व्यवसायाबरोबरच सामाजिक बांधिलकी ची जाण ठेऊन शेतकऱ्यांना योग्य तेच मार्गदर्शन करावे व आवश्यक तेवढ्याच निविष्ठा देऊन शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढावे….डाॅ.तानाजी चिमनशेट्टे यांनी असे आवाहन केले

Image
व्यवसायाबरोबरच सामाजिक बांधिलकी ची जाण ठेऊन शेतकऱ्यांना योग्य तेच मार्गदर्शन करावे व आवश्यक तेवढ्याच निविष्ठा देऊन शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढावे….डाॅ.तानाजी चिमनशेट्टे यांनी असे आवाहन केले संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषि विज्ञान केंद्र सगरोळी येथे, वनामती नागपुर व राष्ट्रीय वनस्पती स्वास्थ्य प्रबंधन संस्थान (NIPHM) हैद्राबाद व कृषी विज्ञान केंद्र सगरोळी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील किटकनाशके विक्रेत्यां करिता कीटकनाशक व्यवस्थापन प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा उद्घाटन सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्कृती संवर्धन मंडळाचे संचालक श्री.रोहित देशमुख उपस्थित होते तर कार्यक्रमाचे मुख्य अतिथी व मार्गदर्शक म्हणून नांदेड जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी डाॅ.तानाजी चिमनशेटे हे होते. कृषी विज्ञान केंद्र सगरोळी राष्ट्रीय कृषी विस्तार प्रबंधन व राष्ट्रीय वनस्पती स्वास्थ्य प्रबंधन संस्थान हैदराबाद या राष्ट्रीय पातळीवरील संस्थांची नोडल प्रशिक्षण संस्था म्हणून काम करीत असून, कृषी विज्ञान केंद्रा मध्ये कृषी सेवा केंद्र परवाना धारकां साठी विविध अभ्यासक्रम चालवले जा...

प्राण्यांच्या भल्यासाठी सेवा करणे हे नोबेल कार्य आहे आणि आजची मोहीम त्या दिशेने एक पाऊल आहे – डॉ. तामलूरकर, एलडीओ काटकलंबा

Image
प्राण्यांच्या भल्यासाठी सेवा करणे हे नोबेल कार्य आहे आणि आजची मोहीम त्या दिशेने एक पाऊल आहे – डॉ. तामलूरकर, एलडीओ काटकलंबा आज 21/10/2021 रोजी, संस्कृती संवर्धन मंडळाच्या डब्ल्यूडीएफ पाणलोट प्रकल्प, पशुसंवर्धन विभाग आणि कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी यांच्या संयुक्त प्रयत्नातून काटकळंबा, ता. कंधार येथे एक पशु आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबिरात एकूण 52 पशु मालकांनी आरोग्य तपासणीसाठी एकूण 324 जनावरे तपासणी करिता आणली होती. डॉ.शिवकुमार तमलूरकर, प. वि. अ. काटकळंब, डॉ. अरविंद दगडे, प. वि. अ, नांदेड आणि डॉ. निहाल मुल्ला, विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र यांनी सर्व प्राण्यांची तपासणी केली. प्राण्यांची तपासणी केल्यानंतर, आजारी प्राण्यांवर उपचार, प्रत्येक प्राण्याला उपयोगी सल्ला आणि औषधोपचार आणि संबंधित प्राण्यांच्या मालकांना रोगाच्या स्थितीची माहिती देण्यात आली. शिबिरामध्ये प्रामुख्याने गोचीड, उवा सारखे बाह्य परजिव आणि अंतर्गत परजीवीचा प्रादुर्भाव, अतिसार, दुधाळ म्हशींमध्ये दुधाचे कमी उत्पादन, वारंवार उलटणे किंवा गर्भधारणा न होणे सारख्या प्रजनन संस्थेतील आजार इ. आढळून आले. स...

अटकळी येथील बायोलॅब व जिरेनियाम प्लांट ला महिला बचत गटांची भेट…

Image
 अटकळी येथील बायोलॅब व जिरेनियाम प्लांट ला महिला बचत गटांची भेट… दि: 27 ऑक्टोबर 2021 रोजी कृषि विज्ञान केंद्रा च्या अटकळी येथील उपकेंद्रात महिला बचत गटांची उद्योग उभारणी साठी बैठक झाली. डॉ. माधुरी रेवणवार यांनी उद्योग उभारणी बद्दल सविस्तर असे मार्गदर्शन केले व तसेच महिलांना बायोलॅब, जिरेनियाम प्लांट दाखवण्यात आला व सविस्तर माहिती जीवन जाधव आणि मधुसूदन देशमुख यांनी दिली. व.ना.म.कृ.वी. परभणी विकसित फुले तोडताना शारीरिक कष्ट कमी होवुन काम सोपे व्हावे या हेतूने फुले तोडण्याच्या वेळी वापरावयाच्या बॅग ची चाचणी येथे घेण्यात आली. या कार्यक्रमासाठी उमेद अभियानाच्या महिला बचत गट सदस्या मोठ्या संखेने उपस्थित होत्या. #kvk #sagroli ​​ #nanded ​​ #agriculture #farm ​​ #krushived #कृषिवेद #farmer

परसबागेतील कुक्कुटपालन करा आणि घराला आर्थिक हातभार लावा

Image
 परसबागेतील कुक्कुटपालन करा आणि घराला आर्थिक हातभार लावा शेती आणि वातावरण यांच्यातील विषमतेमुळे शेतकरी, शेतीच्या उत्पादनात उत्पन्नामध्ये सतत तडजोड करताना दिसत आहे. या काळात आर्थिक स्थैर्य राखण्यात शेतकऱ्याला अडचणी येत आहेत. याच्यातून पर्याय म्हणून शेतीपूरक व्यवसाय करणे हा उत्तम मार्ग आहे. याच जोडधंदा पैकी कुक्कुटपालन हा एक महत्वाचा जोडधंदा आहे आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन केदारवडगाव व लाट ( खु). ता. नायगाव, येथील पाणलोट समित्यांनी ‘परसबागेतील कुक्कुटपालन’ व्यवसाय करण्यास प्राधान्य दिले आणि दिनांक ७/१०/२०२१ रोजी जागतिक अंडी दिनाचे औचित्य साधून या दोन्ही गावांमध्ये परसबागेतील कुक्कुटपालन या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम आणि त्यानंतर पाणलोट समितीमार्फत निवडलेल्या शेतकऱ्यांना कावेरी जातीच्या गावरान कुक्कुटपक्ष्यांचे वाटप करण्यात आले. प्रशिक्षण कार्यक्रमात डॉ. निहाल मुल्ला, विषय विशेषज्ञ- पशुवैद्यक शास्त्र, कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी यांच्याकडून कुक्कुटपक्ष्यांचे व्यवस्थापन, खाद्य तयार करण्याची पद्धत, लक्षणांवरून आजार ओळख व लसीकरण इत्यादी गोष्टींची माहिती देण्यात आली, या सोबतच...

Financial Literacy Program in coordination with DRISHTI..

Image
 Financial Literacy Program in coordination with DRISHTI.. Extension workers who are working among rural self-help groups and also for loan disbursement and repayment for establishing small enterprises need deep knowledge regarding finance management skills. They need to explain financial procedures and their importance to people. Hence financial literacy among themselves is more important while working in the field. Hence Training programme on Financial literacy was conducted for such extension workers by the Dept. of Home Science, Krishi Vigyan Kendra, Sagroli Nanded II on 22/10/2021 in coordination with DRISHTI, Mumbai. Mr. Hetal Pathak from Mahila Housing Seva Trust, Gujarat was the resource person for this programme. He explained each and every point regarding financial management, its importance, various tools for financial awareness among rural people very effectively. Total 14 extension workers from Sagroli, nearby village and Mumbai were present for the programme.  #F...

किड व्यवस्थापनाच्या विविध पद्धतीचा एकात्मिक वापर करून पर्यावरणाला अनुकूल असे किड व्यवस्थापन करावे

Image
किड व्यवस्थापनाच्या विविध पद्धतीचा एकात्मिक वापर करून पर्यावरणाला अनुकूल असे किड व्यवस्थापन करावे…… डॉ. कृष्णा अंभुरे दि. २७/०९/२०२१ रोजी कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी आणि संत योगिराज महाराज शेतकरी उत्पादक कंपनी लि. बाबूळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे बाबूळगाव ता. कंधार येथे पेरणीपूर्व प्रशिक्षण आणि रब्बी हंगाम पिकातील एकात्मिक किड व्यवस्थापन कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी डॉ. कृष्णा अंभुरे यांनी रब्बी हंगाम पिकातील विविध किडींची ओळख आणि किड व्यवस्थापनाच्या विविध पद्धतीचा एकात्मिक वापर करून पर्यावरणाला अनुकूल असे किड व्यवस्थापन व त्यासाठी लागणाऱ्या विविध यांत्रिक, जैविक आणि रासायनिक निविष्ठांबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला शेतकरी उत्पादक कंपनी सदस्य व गावातील शेतकरी उपस्थित होते.  #Rabi   #crop   #farmers   #pest   #management   #kvk   #Nanded   #किड   #व्यवस्थापन   #रब्बी   #यांत्रिक   #जैविक   #रासायनिक   #निविष्ठा   #कंधार